खोपोली ़: प्रतिनिधीजनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोगलवाडी (खोपोली) येथील हिंदी विद्यालयाचे हिंदी भाषा शिक्षक भाईदास पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली. त्यासाठी भाईदास पाटील यांना केएमसी महाविद्यालयाचे प्रा. डॉ सादिका अस्लम नवाब यांनी मार्गदर्शन केले. पाटील यांनी ‘21 व्या शतकातील मराठी व हिंदी भाषेतील कवियत्री यांचे योगदान व स्त्री विमर्स‘ या विषयावर संशोधन केले. त्यासाठी त्यांना ही पीएचडी मिळाली आहे. संस्थेचे अध्यक्ष एम. आर. पांडे, मुख्याध्यापक वाय. टी. कोकणे, शालेय समिती अध्यक्ष कुलवंत सिंह, माजी नगरसेवक राजू ढूमणे आणि सर्व शिक्षकांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल भाईदास पाटील यांना सन्मानित केले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper