
पनवेल : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत, युनिसेफ, हिंदुस्तान लिव्हर आणि व शेल्टर या संस्थांच्या माध्यमातून पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील, प्रभाग क्रमांक 17 मधील मालधक्का परिसरातील नागरिकांना शारीरिक स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले आणि हात धुणे व शारीरिक स्वच्छता राखणे कामी प्रत्येक कुटुंबाला पाच मोती साबणाचे वाटप सोमवारी करण्यात आले.
या वेळी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक आंबेकर, नंदा टापरे, शैला आंबेकर आणि गुप्ता भाभी, पर्यवेक्षक शरद उरणकर, रमेश गरुडे, नंदू जाधव, अंकुश पाटील व स्वच्छता दूत उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper