भाजपचे एकनाथ भोपी यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष, सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एमएमआरडीएचे माजी संचालक एकनाथ भोपी यांचे कोरोनामुळे गुरुवारी (दि. 22) वाशी येथील पीकेसी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.

एकनाथ भोपी यांच्या अंत्यविधीला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूरचे उपसरपंच अशोक पाटील, राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply