पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष व सरकारचे काम पाहून शिरवली गु्रप ग्रामपंचायतीमधील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 6) भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरपंच दीपक बोंडे, भालचंद्र सिनारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, परशुराम चोरघे, रमेश तुपे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शिरवली गु्रप ग्रामपंचायतीमधील राजन वाघे, श्रीकांत पवार, शंकर वाघे, नरेश वाघे, गणेश वाघे, चंद्रकांत वाघे, काळूराम वाघे, वामन वाघे, वामन पवार, स्वप्नील वाघे, सुभाष वाघे, रोशन वाघे, भवन वाघे, सत्यवान वाघे, नामदेव वाघे, शांताबाई पवार, यमुना वाघे, कल्पना पवार, द्रुपदा वाघे, रसिका पवार यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper