Breaking News

भाजपतर्फे आधार कार्ड शिबिर; चिंध्रणमध्ये उपक्रम; अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष चिंध्रण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. वाकडी येथे आयोजित हे शिबिर 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. शाळेपासून ते बँकेपर्यंत प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. म्हणूनच भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर व पनवेल तालुका चिटणीस नामदेव जमदाडे यांच्या प्रयत्नाने आणि भाजप चिंध्रण पंचायत समिती विभागातर्फे वाकडी येथे मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आधार नोंदणी, आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख बदलणे, ई-मेल, मोबाईल नंबर अपडेट करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुण पाटील, शिवाजी दुर्गे, शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक बोंडे, उपसरपंच मंगेश पाटील, शशिकांत खुटले, अंकुश म्हात्रे, जनार्दन पाटील, संजय चोरघे, निशांत पाटील, उमेश वारदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply