पनवेल : प्रतिनिधी
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील विविध सेलच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
भाजप उत्तर रायगड जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ता सेलच्या संयोजकपदी सी. सी. भगत, सहकार सेलच्या जिल्हा संयोजकपदी कुंडलिक काटकर, प्रज्ञा प्रकोष्ठ जिल्हा संयोजकपदी डॉ. मयुरेश जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजकपदी अभिषेक पटवर्धन, कायदा सेल जिल्हा संयोजकपदी अॅड. विशाल डोंगरे आणि झोपडपट्टी सेल जिल्हा संयोजकपदी राहुल वाहुळकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.
प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेला भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळातील घटकांचा विचार करून काम करीत असतो. जिल्हा सेलच्या विविध समित्यांवर नियुक्त करण्यात आलेले प्रमुख आपापल्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्यरत असून, त्यांच्यावर पक्षामार्फत दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पूर्ण करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी या नियुक्त्यांच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper