कर्जत : विजय मांडे
भाजप कर्जत शहर कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत चार विद्यार्थिनींचा वर्षभराचा शालेय खर्च करणार आहे.कर्जत शहर महिला कमिटी बेटी बचाओ, बेटी पढाओ सहसंयोजिका सरस्वती चौधरी, कर्जत शहर उपाध्यक्ष गायत्री परांजपे, नगरसेविका स्वामिनी मांजरे आणि विभागप्रमुख लीना गांगल यांनी कर्जत येथील महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेतील चार विद्यार्थिनींचा शालेय फीचा वर्षभराचा खर्च उचलून विद्यार्थिनींच्या शिक्षणास हातभार लावला. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सहकार्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमास कर्जत तालुका महिला अध्यक्ष स्नेहा गोगटे, गीतांजली देशमुख, शाळेच्या सहशिक्षिका स्नेहा गाडे, अर्चना भुसाळ आणि शालेय महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper