
मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे.
बुधवारी (दि. 24) मुंबई दादर भाजप कार्यालय येथे आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व कोकण विकास आघाडी अध्यक्ष सुहास अडविरेकर यांच्या मान्यतेने सर्व पदाधिकारी यांची तालुका निहाय नेमणूक करण्यात आली आहे. सह संपर्क प्रमुख रायगड मदन केशव वाजे, गोविंद भायदे, जिल्हा सह संपर्क प्रमुख महिला रायगड सौ शुभांगी सुर्वे, तालुका संपर्क प्रमुख रघुनाथ भायदे (म्हसळा), संतोष साबळे (श्रीवर्धन), सुरेश लांबे (मुरूड), संदीप रेवाले (रोहा), विनोद मानकर (तळा), संतोष फिलसे (महाड), राजेंद्र केळुसकर (कर्जत) तालुका सह संपर्क प्रमुख निलेश गिजे (म्हसळा), हेमंत रामाणे (म्हसळा), कृष्णा भोंबडे (श्रीवर्धन), कृष्णा किंजळे (मुरूड), भालचंद्र पवार (रोहा), प्रदीप साळवी (महाड) असी नेमणूक करण्यात आली आहे.
गावा गावात भाजपचे विचार करून शेवटच्या व्यक्तीचा विकास हाच भाजपचा ध्यास या मोहीमेत सामील व्हा, असे आवाहन या निमित्त संयोजक रायगड जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा कोबनाक यांनी केले आहे. या कार्यक्रमाला भाजपा कोकण विकास आघाडी सरचिटणीस संजय सुर्वे, राजाराम मोरे, नितीन गावकर, राजाराम मोरे, महीला अध्यक्ष रसिका आनेराव व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper