धाटाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि. 20) भाजप युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून अलिबाग परहुर पाडा येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धधाम येथील वृद्धांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, कणे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील, कुरडुस ग्रामपंचायत सरपंच अनंत पाटील, रोहा कामगार तालुका अध्यक्ष विलास डाके, युवा उद्योजक चक्रपाणी म्हात्रे, रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, श्रीकांत दरडे, सागर डाके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper