कामोठे : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन दिनानिमित्त भाजप नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत यांनी सेक्टर 34, कामोठेतील श्री गणेश मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवासाठी सॅनिटायझर स्टॅण्ड मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांचेकडे सुपूर्द केला. मागणी न करता स्वतःहून दिलेल्या भेटीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.या वेळी मंडळाचे खजिनदार शेखर जगताप, मंडळाचे हितचिंतक शाहू भोसले, पृथ्वी भोजनालयचे श्री विशाल सावंत उपस्थित होते. तसेच नालंदा बुद्ध विहार यांना देखील हॅन्डफ्री सॅनिटायझर स्टॅण्ड भेट दिला. नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट तर्फे देखील दोन्ही नगरसेवकांचे आभार मानण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper