रसायनी ः रामप्रहर वृत्त
वंदे मातरम जनरल कामगार संघटनेंतर्गत रसायनी रेल्वेस्थानक येथील जयहिंद रिक्षा चालक मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) करण्यात आले.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी प्रमुख सल्लागार असलेली वंदे मातरम जनरल कामगार संघटना रिक्षा चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहे. या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रसायनी रेल्वेस्थानक येथील जयहिंद रिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांनी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने संघटनेच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, लक्ष्मण गोडीवले, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी, तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना विशाल जोशी, माजी सरपंच गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, रिक्षा चालक, मालक, नागरिक उपस्थित होते.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper