कर्जत : बातमीदार
उल्हास नदीच्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कर्जत शहरातील सखल भागात पुराचे पाणी घुसले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कर्जतमध्ये येऊन पूरबाधित भागांची पाहणी केली. त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper