कर्जत : बातमीदार
भाजप भटके विमुक्त मोर्चाच्या रायगड जिल्हा सहसंयोजकपदी माथेरानमधील तुकाराम बाबू आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या हस्ते तुकाराम आखाडे यांना नुकताच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भटके विमुक्त जाती जमातीच्या न्याय्य हक्कासाठी सदैव कार्यरत राहण्याचा मनोदय आखाडे यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुकाराम आखाडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper