पनवेल ः रामप्रहर वृत्त
डॉक्टर दिनाचे औचित्य साधून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेने तसेच तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील व विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे यांच्या साथीने पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे व कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील यांच्या वतीने कोन पंचायत समितीमधील सर्व क्लिनिकमधील डॉक्टरांचा सन्मान करून त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यात आले.
सदर विभागातील डॉक्टरांनी कोरोनाच्या संकट काळात आपले क्लिनिक सुरू ठेवून गरीब-गरजू रुग्णांची सेवा केली. त्याबद्दल सर्व डॉक्टर आणि स्टाफचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. या वेळी पनवेल तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, कोन पंचायत समिती अध्यक्ष संदेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर भागीत, विनेश भागीत, रोहित घरत, युवा नेते समीर पाटील, उपाध्यक्ष शुभम पाटील, अरविंद माळी, रमेश भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper