Breaking News

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का; लँडरचा संपर्क तुटला

बंगळुरू ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर पोहोचलेल्या विक्रम लँडरचा संपर्क शनिवारी (दि. 7) मध्यरात्री दोनच्या सुमारास तुटला. रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. या वेळी संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेवून होते. 1 वाजून 53 मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते, मात्र चांद्रयान अवघे 2.1 किमीवर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. या वेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply