पॅरिस : जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक असलेले राफेल विमान मंगळवारी (दि. 7) दसर्याच्या मुहूर्तावर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल विमान स्वीकारले. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. राफेल हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ असा होतो. मला खात्री आहे की, नावाप्रमाणे नक्कीच हे विमान वादळ निर्माण करेल, अशा भावना राजनाथ यांनी या वेळी व्यक्त केल्या. भारत आणि फ्रान्समध्ये 23 सप्टेंबर 2016 रोजी राफेल करार झाला होता. त्यानंतर आता योग्यवेळी राफेल भारताच्या ताब्यात येत आहे, असे नमूद करताना भविष्यात हवाईदलाची क्षमता आणखी वाढवण्यावर आमचा भर राहणार असल्याचे राजनाथ म्हणाले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper