Breaking News

भारतीय कुस्ती महासंघाला सुमितमुळे 16 लाखांचा दंड

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे. ‘डब्ल्यूएफआय’ला टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान गमवावे लागणार आहे. त्याचबरोबर 16 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.
गेल्या महिन्यात बल्गेरिया, सोफिया येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत सुमितने 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. याच स्पर्धेदरम्यान झालेल्या उत्तेजक चाचणीत सुमित दोषी आढळला आहे. जागतिक कुस्ती महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) सुमितवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून डिसेंबर 2021मध्ये त्याचा ब नमुना चाचणी अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. यात दोषी आढळला तर त्याच्यावर आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply