भारतीय महिलांचा मालिका विजय

क्वाललांपूर : वृत्तसंस्था

मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 1-0 असा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसर्‍या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. यानंतर चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी अखेरच्या सामन्यातही बाजी मारून मालिका विजयावर शिक्का मारला.

नवज्योत कौर हिने 35व्या मिनिटाला केलेला निर्णायक गोल सामन्यातील एकमेव गोल ठरला. या गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी भारताने अखेरपर्यंत टिकवताना शानदार विजय मिळवला. यानंतर भारतीयांनी मलेशियाच्या गोलक्षेत्रात अनेक हल्ले केले, मात्र गोल करण्यात त्यांना यश आले नाही.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply