Breaking News

भारत-न्यूझीलंड आमनेसामने

आजपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका

ऑकलंड ः वृत्तसंस्था
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात शुक्रवारपासून (दि. 24) होत आहे. नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा भारताकडे असणार आहे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचा वेगळाच मास्टर प्लॅन असल्याचे सांगितले आहे.
वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाने भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळे 24 जानेवारीपासून सुरू होणार्‍या सामन्याआधी विराटला याबाबत विचारले असता त्याने कोणताही बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार नाही. आमचे आणि न्यूझीलंड संघाचे संबंध चांगले आहेत. आम्ही फक्त मैदानावर प्रतिस्पर्धी आहोत, असे सांगितले.
न्यूझीलंडने आयसीसी वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला तेव्हा आपण आनंदी असल्याचेही विराटने सांगितले. विराटने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ही मालिका चांगले क्रिकेट खेळणार्‍या दोन संघांमधील आहे, असे सांगितले. तसेच न्यूझीलंड एक चांगली टीम आहे आणि या संघाबद्दल आम्हाला आदर आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हा आम्हाला आनंद झाला. कारण जेव्हा आपण हरतो तेव्हा आपल्याला मोठा विचार करावा लागेल. एक संघ म्हणून त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट होती. मला वाटत नाही की या मालिकेत बदल होईल, असे उत्तर देत त्याने सर्वांचे मन जिंकले.
दरम्यान, न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघात विशेष बदल केले जाणार नाहीत, असे संकेतही विराटने या वेळी दिले, तसेच या मालिकेपूर्वी विराटने पुन्हा एकदा केएल राहुलची जोरदार प्रशंसा केली आणि टीम मॅन म्हणून त्याचे वर्णन केले. कोहली म्हणाला की, राहुलदेखील विकेटच्या मागे चांगले काम करीत आहे. सामन्यात कोणत्याही परिस्थितीसाठी तो सज्ज आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply