Breaking News

भारत-श्रीलंका मालिका चार दिवस लांबणीवर

कोरोना संसर्गामुळे निर्णय

कोलंबो ः वृत्तसंस्था
श्रीलंका क्रिकेट संघाच्या दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्धचे सहा सामने चार दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिला एकदिवसीय सामना आता 13 जुलैऐवजी 17 जुलै रोजी होईल.
इंग्लंड दौर्‍यावरून परतलेले फलंदाजीचे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि विदा विश्लेषक जी. टी. निरोशान यांना कोरोना झाल्यामुळे श्रीलंकेच्या संघाला विलगीकरणाला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-श्रीलंका क्रिकेट मालिका 13 जुलैऐवजी 17 जुलैला सुरू होईल. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी दोन्ही मंडळांनी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 13, 16 आणि 19 जुलै या तारखांना तीन एकदिवसीय सामने होणार होते. त्याचप्रमाणे 22, 24 आणि 27 जुलै या दिवशी टी-20 सामने रंगणार होते. श्रीलंकेचा संघ इंग्लंडहून परतल्यानंतर 48 तासांत फ्लॉवर यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी निरोशान यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
दरम्यान, भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपुढे असलेला कोरोना साथीचा धोका लक्षात घेता श्रीलंका क्रिकेट मंडळाने दोन चमू जैव-सुरक्षित वातावरणात सज्ज ठेवले आहेत. हे चमू कोलंबोत आणि दाम्बुला येथे आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply