Breaking News

भीषण अपघातात मजुराचा मृत्यू

ठाणे ः प्रतिनिधी

मजुरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. ठाण्यातील साकेत ब्रिजवर टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख (28, रा. मुंब्रा, ठाणे) या मजुराचा मत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 21 कामगार जखमी झाले आहेत. यातील 16 जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर उर्वरित पाच जणांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेम्पो ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये वृक्ष फांद्या तोडणार्‍या ठेकेदाराचा टेम्पो  सुमारे 21 कामगांराना घेऊन साकेत ब्रिजवरून नाशिक-मुंबई वाहिनीवरून जात होता. मुलुंडच्या दिशेने जाणार्‍या या टेम्पोवरील चालकाने मद्यपान केलेले असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो साकेत ब्रिजवर पलटी झाला. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळून अडकून पडला. कापूरबावडी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply