
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 13) साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचत्य साधून जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप, तसेच पंचायत समिती शेष फंडातून करण्यात येणार्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे उद्घाटन पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी भाजपचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भूपेंद्र पाटील, राज पाटील, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, ज्ञानेश्वर पाटील, युवानेते यतीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भगत, सरचिटणीस उदय म्हस्कर, महेश केणी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper