Breaking News

भेंडखळ गावात राममंदिर अभियानाची शोभायात्रा उत्साहात

उरण ः प्रतिनिधी

नुकतीच उरण तालुक्यातील भेंडखळ गावात श्रीराम मंदिर निर्माण अभियानाची उत्साहात सुरुवात झाली. या वेळी रामनाम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उरणचे प्रमुख दर्शन पाटील, मिलिंद पाटील, मनीष पाटील, संजय ठाकूर यांनी नियोजन केले.

न्यू नणकेश्वर भजन मंडळाचे किशोर भोईर, जितेंद्र भोईर, तसेच ग्रामपंचायत सदस्य रतन ठाकूर, पालवी सामाजिक संस्थेचे चंदविलास घरत, समीर भोईर, लक्ष्मण ठाकूर, जनाई हरिपाठ भजन मंडळाचे सीमा ठाकूर, हभप प्रभाकर ठाकूर, वाद्यवृंद मंगळाष्के प्रमुख काशिनाथ पाटील, मंगेश घरत, मुक्ताई बचत गटाच्या प्रमुख मीनल म्हात्रे, बहीरीदेव बचत गटाच्या प्रमुख भाग्यश्री पाटील, राधे राधे बचत गटाच्या मथुरा ठाकूर, माऊली गटाच्या दीपिका ठाकूर, अन्नपूर्णा महिला गटाच्या नंदा नागावकर, मानिबाई भगत, जरीमरी आई नवरात्रोत्सवाचे प्रमुख किरण घरत, तुषार ठाकूर, मनसे तालुका अध्यक्ष राकेश भोईर, आदर्श कामगार भूषण प्रांजल भोईर, खोपटा अभियान मंडळ प्रमुख सचिन पाटील, चिरनेर मंडळ प्रमुख श्रीपाद कातरणे, केळवणे मंडळ प्रमुख चेतन पाटील, सचिन केदारी आदींच्या उपस्थितीत शोभायात्रा पार पडली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply