सुदैवाने जीवितहानी नाही
महाड ः प्रतिनिधी
महाड-पुणे मार्गावरील भोरघाटात रविवारी (दि. 7) सकाळी भलीमोठी दरड कोसळल्याने काही काळ हा मार्ग बंद पडला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून या ठिकाणी काम करणारे ग्रामस्थ आणि ‘साबां’च्या ठेकेदाराने येथील दगड हटवून वाहतूक सुरळीत केली.
महाड-पुणे मार्गावरील भोर वरंध घाट दिवसेंदिवस धोकादायक ठरू लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही घाट सुरक्षित होत नाही. अतिवृष्टीमुळे कोसळलेला घाट मागील सहा महिने मुख्य वाहतुकीसाठी बंद आहे. त्यातच रविवारी घाटात महाड-भोर हद्दीवर वाघजाई देवी येथे भलीमोठी दरड कोसळली. सुदैवाने या वेळी कोणतेही वाहन घटनास्थळी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
RamPrahar – The Panvel Daily Paper