उरण : रामप्रहर वृत्त
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उरण मतदारसंघातील रानसई आणि सारसई येथे आदिवासी संवाद मेळाव्यांचे आयोजन करून आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला. या मेळाव्यात त्यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी उपस्थित होते. रानसई येथे झालेल्या मेळाव्यात मंत्री उईके यांनी आदिवासी बांधवांशी संवांद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी जातीच्या प्रमाणपत्रांसह इतर योजनांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
कामगार नेते जितेंद्र घरत, राणसईच्या सरपंच राधा पारधी, सुरेश पारधी, अजित पाटील, गपू पाटील, समीर मडवी, सुनील गावडी, नारायण बरतोड, बाळाराम चौधरी, नामदेव पारधी, मधुकर पारधी, विद्याधर जोशी, गणेश पाटील, कलाकार टाकले, विजय मुरकुडे, शेखर कानडे, जीवन टाकले, नितेश खारकर, अमर म्हात्रे, रूपेश धुमाल आणि वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.
तरसारसई येथे झालेल्या संवाद मेळाव्यात मंत्री उईके यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी त्यांच्या हस्ते न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लोककला साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, किराणा दुकान सामान खरेदी, तांदूळ काढणी मशिन, पिठगिरणी खरेदी, मत्स्यपालन आणि विविध व्यवसायांसाठी अर्थसाहाय्याचे धनादेश लाभार्थ्यांना देण्यात आले. यासोबतच, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोबाईल मेडिकल युनिटचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. वृक्षारोपणही करण्यात आले.
या मेळाव्यात पनवेल तालुका दक्षिण मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उलवे मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर घरत, डॉ. अविनाश गाताडे, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मुरकुटे, संजय टेंबे, रत्नाकर घरत, जीवन टाकले, दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, विद्याधर जोशी आदी उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper