अलिबाग : जिमाका
हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय करण्यात आली आहे, तसेच तेथे आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकादेखील नियुक्त करण्यात येतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 108 रुग्णवाहिकादेखील सहज उपलब्ध होतील, अशी माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली.
- मतदारसंघात 7736 दिव्यांग असून 1220 अंध (क्षीण दृष्टी) आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. एकंदर 673 व्हील चेअर्सची मागणी असून 300 पेक्षा जास्त व्हील चेअर्स उपलब्ध झाल्या असल्याची माहितीही दिली.
- 40 हजार लिटर दारू जप्त
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पथके बारकाईने लक्ष ठेवून असून 40 हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे असेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
- सिमी संघटनेवर बंदी,
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक स्तरावरून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात व्हावी, असे जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper