मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्कवर झाला. यावर अभिनेता सुमीत राघवन हा ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. एक मतदार म्हणून मला माझी फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, असे त्याने म्हटले आहे.
सुमीतने ट्विट करीत असेही नमूद केले आहे की, ‘गड आला पण सिंह गेला, पण आज म्हणावं लागेल.. सत्ता आली पण पत्ता गेला, मातोश्री ते सिल्व्हर ओक. या ट्विटसाठी सुमीतने ‘बाळासाहेब ठाकरे’ असा हॅशटॅग वापरला आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न केले, तसेच भिन्न विचारसरणीच्या पक्षांशी हात मिळवत उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केल्याने सुमीतने नाराजी व्यक्त केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper