मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे यांना आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)च्या नोटीसनंतर 22 ऑगस्ट रोजी या कार्यालयावर धडकण्याचा आक्रमक निर्णय मनसेने अचानक बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर येऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहारप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्याने मनसेने ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मनसेने हा शांतता मोर्चा रद्द केला असून, राज यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन ट्विटरद्वारे केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper