Breaking News

मनसेतर्फे पालीतील मारुती मंदिरात पोलीस बंदोबस्तामध्ये आरती, हनुमान चालिसा

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुका मनसेतर्फे बुधवारी (दि. 4) पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यात आली तसेच छोट्या स्पीकरवर हनुमान चालिसादेखील लावण्यात आली होती. या वेळी मंदिराभोवती व पाली शहरात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तालुक्यातील मनसेच्या 10 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती.  पालीतील मारुती मंदिरामध्ये आरती करण्यासाठी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, तालुका सचिव सचिन झुंजारराव, मनसे विद्यार्थी सेना सचिव भावेश बेलोसे, जांभूळपाडा विभाग अध्यक्ष शेखर चव्हाण, चव्हाणवाडी शाखा अध्यक्ष परेश वनगले, परळी विभाग माजी अध्यक्ष अल्पेश दळवी, विठ्ठल मनवे, दिनेश मोरे व विजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply