Breaking News

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुन्हा पावसाचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढणारा परतीचा पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून, 21 आणि 22 ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करीत या संदर्भातील माहिती दिली.
बंगालच्या उपसारगात पुन्हा एकदा पावसासाठी पूरक वार्‍यांची निर्मिती झाल्यामुळश या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी राज्यातील वातावरणावर याचे थेट परिणाम होऊन बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेला हा इशारा पाहता आधीच अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाडा आणि इतर भागातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply