पनवेल ः रामप्रहर वृत्त
मराठी माणूस कोणत्याही व्यवसायात यशस्वी होऊ शकतो, असा आदर्श जीजीस् केक्सचे कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उद्घाटनावेळी काढले. नांदगाव येथील कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांनी नवीन पनवेल येथे जीजीस् केक्स हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. अक्षय्य तृतीया सणाचे औचित्य साधून त्यांच्या या जीजीस् केक्सचे महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी त्यांनी कल्पेश पाटील आणि जितीक्षा मोकल यांचे अभिनंदन करीत त्यांना व्यवसायाच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनीही जीजीस् केक्सला भेट देत शुभेच्छा दिल्या. या वेळी महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper