Breaking News

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड : प्रतिनिधी

वेदा जनजागृती मंचाच्या वतीने महाडमध्ये महिलांच्या आंडरआर्म स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पंचायत समिती महिला संघ विजेता झाला.

महिलांना विविध व्यासपीठ मिळवून देणारे डॉ. दिगंबर गिते यांच्या वेदा जनजागृती या सामाजिक मंचाच्या वतीने रविवारी (दि. 2) महाड येथील भिलारे मैदानावर महिलांच्या आंडरआर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. साखळी पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत रायझींग स्टार, पंचायत समिती संघ, जगदंब शिक्षक संघ आणि दिशा अबॅकस संघाने भाग घेतला होता. या वेळी अंतिम फेरीसाठी रायझींग स्टार व पंचायत समिती संघ यांच्यात निर्णायक सामना झाला. या मध्ये पंचायत समिती संघाने बाजी मारुन विजयी चषक पटकावला. तसेच या स्पर्धेत करुणा कदम यांना उत्कृष्ट फलंदाज तर पुर्वा बारटक्के यांची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply