Breaking News

महाडमध्ये महिलांची क्रिकेट स्पर्धा

महाड  : प्रतिनिधी

येथील क्रिकेट कट्टा ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्टार क्रिकेट संघाने विजेतेपद पटकाविले, तर झेडपी संघ उपविजेता ठरला. महिलांना सांघिक खेळांमधून संधी मिळावी यासाठी क्रिकेट कट्टा ग्रुपची स्थापना करून या ग्रुपच्या वतीने रविवारी (दि. 20) महाडमध्ये महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्टार संघ, न्यू महाड इलेव्हन संघ, रायझिंग स्टार, न्यूनिक संघ, झेडपी संघ, दिव्यांगांचा पुणे इनिंग स्टार संघ, पंचायत समिती संघांनी सहभाग घेतला. तिसर्‍या क्रमांक न्यूनिक संघाने मिळविला. विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सोनाली कोरपे, उत्कृष्ट गोलंदाज  निकीता जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षला शिर्के, अंतिम सामनावीर छाया साळूंखे, मालिकावीर सुगंधा वडाळकर यांना गौरविण्यात आले. झेडपी संघ हा शिक्षकांचा संघ असून यामध्ये खेळणार्‍या बहुतांश खेळाडू या पन्नाशीपार वयाच्या असल्याने त्यांचा जोश पाहून त्यांचे विशेष कौतुक होत आहे, तर अपंगत्वावर मात करून क्रिकेट खेळून आम्हीही कुठे कमी नाही हे पुणे इनिंग स्टार या दिव्यांगांच्या संघाने दाखवून दिले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply