
महाड : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब आणि हिरवांकुर या संस्थेच्या वतीने महाड ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच या झाडांना प्रोटेक्शन गार्ड म्हणून ड्रम लावण्यात आले. रोटरी क्लब ऑफ महाड आणि हिरवांकुर संस्था यांच्या सौजन्याने महाड ग्रामीण रुग्णालय अर्थात ट्रामा केअर सेंटर येथे डॉ. भास्कर जगताप यांच्या सहकार्याने इकोफ्रेंडली वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी रोटरी अध्यक्ष राजेंद्र मेहता, सेक्रेटरी संतोष नगरकर, प्रदीप शेट व रोटरी सदस्य, तसेच हिरवांकुरच्या सदस्या ममता मेहता, स्नेहा गांधी, श्वेता शेठ, हर्षदा शेट, संगीता सावंत, प्रांजल प्रदीप शेट आदी उपस्थित होते. डॉ. जगताप यांनी मार्गदर्शन केले. ओडीसी कंपनीचे संजय सावंत यांनी मोफत ड्रम देऊन मोलाचे सहकार्य केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper