नवी दिल्ली ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी (दि. 27) ही मदत जाहीर केली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका राज्यातील शेतीलाही बसला. पुराचे पाणी शेतात आल्याने प्रवाहाच्या वेगात पिकेही वाहून गेली, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper