Breaking News

महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू

निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

कणकवली : प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

एका बाजूला उद्धव यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले आणि त्याच वेळेला मालवण शिवसेना नगराध्यक्ष आणि अधिकारी एका ठेकेदाराकडून पैसे घेताना स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकले. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार. कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे, अशा आशयाचे ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने स्थापन केलेल्या सरकारकडे बहुमत नसल्याचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केले होते. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील परिस्थितसंदर्भात वक्तव्य करताना ट्विटरवरून शिवसेनेला लक्ष्य करणार्‍या निलेश यांनी फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केले होते. काहींना वाटतं खेळ संपला, पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जोपर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तोपर्यंत सामना होणारच, असे सूचक वक्तव्य निलेश यांनी केले होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply