मुंबई : प्रतिनिधी
भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करीत आहेत त्यांना माझे हे उत्तर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 7) दसरा मेळाव्यात विरोधकांना ठासून सांगितले.भाजपला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कलम 370 काढू नका म्हणणार्या काँग्रेसला द्यायचा का? शरद पवार आणि इतर मंडळींचे टार्गेट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपले टार्गेट तेच राहणार. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांचा कोथळा काढू, असा इशाराही ठाकरे यांनी या वेळी दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper