पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम तसेच ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन सर्व शासकीय कार्यालयांत रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानात ध्वजारोहणाचा सोहळा झाला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण सोहळ्याला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सभापती, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, सुरक्षा बल आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper