विजेत्यांना पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडच्या वतीने, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित योनेक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सिनिअर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात झाली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि.15) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात झाले.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून कामगार नेते महेंद्र घरत, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी सिद्धार्थ पाटील, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय.टी. देशमुख, स्पर्धेचे संयोजक व बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड (बीओआर)चे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्टार युनियन लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय तिवारी, ताराचंद इन्फ्रा लॉजिस्टिकचे व्यवस्थापकीय संचालक विनय अगरवाल, माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू लिरॉय डी’सा, जीएमबीए चे अध्यक्ष प्रदीप अयंगार, बीओआरचे उपाध्यक्ष रवींद्र भगत, शिवकुमार करयिल, सेक्रेटरी डेव्हिड अल्वारिस, खजिनदार नरेंद्र जोशी, रेफरी विनय जोशी, मयुरेश पाटील यांच्यासह खेळाडू व बॅडमिंटन रसिक उपस्थित होते.
स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे 300 सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग होता. उत्तम व्यवस्थापनामुळे सर्व सामने नियोजित वेळेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाले. पुरुष एकेरी गटात अथर्व जोशी यांनी विजेतेपद, तर ओम गवंडी उपविजेता, महिला एकेरी गटात श्रुती मुंदडा विजेतेपद व उपविजेती आर्या कोरेगावकर, पुरुष दुहेरी गटात प्रथम क्रमांक विप्लव कुवळे व विराज कुवळे, द्वितीय क्रमांक अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार, महिला दुहेरी गटात प्रथम क्रमांक नेहाल गोसावी व विधी चाफेकर, द्वितीय क्रमांक अनन्या गाडगीळ व सानिया पाटणकर तसेच मिश्र दुहेरी गटात विजेतेपद दीप रामभिया व सोनाली मिरखेलकर, तर उपविजेतेपद सोहम पाठक व इशिता कोरेगावकर यांनी पटकाविले.
विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण चार लाख रुपयांची रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंसाठी अतिरिक्त दीड लाख रुपयांचे विशेष रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून 24 वर्षे जबाबदारी सांभाळणारे सुंदर शेट्टी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लाईफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper