Breaking News

महाविकास आघाडी सरकार हाय हाय!

मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी खारघर भाजपची निदर्शने

खारघर ः रामप्रहर वृत्त

राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक करून त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. त्यांनी डी गँगसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळे खारघरमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर गुरुवारी (दि. 24) निदर्शने करून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अटक झालेल्या नेत्याने त्वरित राजीनामा द्यायला हवा हे सांगताना भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता, दाऊदशी हितसंबंध, आर्थिक व्यवहार अशा सर्व गोष्टी तपासल्यावरच ईडीने मलिक यांना अटक केलेली आहे.

भाजप खारघर मंडल सरचिटणीस यांनी 1993च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार म्हणून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीशी व्यवहार करताना दहशतवाद्याना अप्रत्यक्षपणे मदत केल्यामुळे अटक झालेल्या नवाब मलिक यांनी नैतिकतेच्या आधारावर लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण राष्ट्रसुरक्षेच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती सभापती संजना समीर कदम, नगरसेवक अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ति नवघरे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, समीर कदम, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष संध्या शारबीद्रे, सोशल मीडिया उपाध्यक्ष जिल्हा मोना आडवाणी, उपाध्यक्ष बिना गोगरी, संजय घरत, गुरूनाथ गायकर, दिलीप केणी, सचिन वासकर, जेष्ठ नागरिक अध्यक्ष नवनीत मारू, मुकेश गर्ग, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, सीमा खडसे, आशा शेंडगे, विपूल चोटलिया, पप्पू खामकर, अशोक पवार, शैलेंद्र त्रिपाठी, रमेश महेंद्रू, अंजूबेन पटेल, स्मिता आचार्य, दुर्गेश, मीनाक्षी अंथवाल आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देऊन नवाब मलिक आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply