भांडूप ः प्रतिनिधी
महावितरणच्या लेखा परीक्षणासाठी आलेल्या महालेखाकार कार्यालयातील अधिकार्यांनी भांडूप परिमंडळाला भेट दिली. महावितरणच्या विविध उपक्रमाबाबत मुख्य अभियंता भांडूप परिमंडल धनंजय औंढेकर यांच्याशी चर्चा केली.
या वेळी, वरिष्ठ उप महालेखाकार मधुसुधन नायर, वरिष्ठ लेखा परीक्षा अधिकारी जी. एस. मनू, सहा. लेखा परीक्षा अधिकारी आदित्य हेलकर, अजय कुमार पासवान, गौरव गुप्ता उपस्थित होते. मुख्य अभियंता भांडूप परिमंडल धनंजय औंढेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी भांडूप परिमंडलाच्या अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) शुभांगी कटकधोंड उपस्थित होत्या.
वीज वितरण क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेली विजेची मागणीमुळे वीज क्षेत्राचे, सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने स्काडा प्रणालीचे अवलंब केले आहे. या प्रणालीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास बिघाड त्वरित शोधता येते, तसेच, त्या ठिकाणी काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेळ ही कमी लागतो. या प्रणालीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महालेखापाल कार्यालयातील अधिकार्यांनी स्काडा सेंटरला भेट दिली. सहाय्यक अभियंता मिथुन पाटील यांनी स्काडा सेंटर प्रणालीचे सादरीकरण केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper