पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरात महाशिवरात्रोत्सव मंगळवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान शंकराच्या ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी शिवभक्तांची रांग लागली होती. याशिवाय अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी काही ठिकाणी भेटी देत दर्शन घेतले.
पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिर, खांदेश्वर येथील शिव मंदिर, रसायनीतील गुळसुंदे येथील पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर यासह अनेक मंदिरांमध्ये महापूजा, अभिषेक, पूजा-अर्चा व अन्य धार्मिक कार्यक्रम झाले. या वेळी भाविकांची गर्दी दिसून आली.
महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेलमधील हुतात्मा स्मारक मैदानात प्रजापिता ब्रह्मकुमारीजच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. या वेळी तारादिदी, डॉ. शुभदा नील आदी उपस्थित होते. इतर ठिकाणीही त्यांनी दर्शन घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper