महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर

इस्तंबूल ः वृत्तसंस्था

टर्कीमध्ये होणारी महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी  महिला बॉक्सिंगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात या वर्षी 4 ते 18 डिसेंबरदरम्यान खेळवली जाणार होती, मात्र या शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने (एआयबीए) जाहीर केले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply