Breaking News

महेश साळुंखे यांच्याकडून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन

पेण ः प्रतिनिधी

पेणमध्ये आदिवासी कुटुंबातील चुमकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची निर्दयी घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 3) स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही सोबत होते.

पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे म्हणाले की, आदिवासी कुटुंबातील चिमुकलीवर नराधमाने केलेल्या अत्याचाराचा आम्ही पक्षाच्या वतीने निषेध करीत आहोत. जोपर्यंत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. नराधमाला फाशी मिळेपर्यंत आम्ही पीडित कुटुंबाला खंबीर पाठिंबा देणार आहोत. या वेळी कार्याध्यक्ष विजय धोत्रे, जिल्हा युवा अध्यक्ष सागर जाधव, पनवेल शहर अध्यक्ष प्रकाश जाधव, पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे, पेण शहर अध्यक्ष नागेश सुर्वे, युवा अध्यक्ष समीर घायतले, नरेश भालेराव, मनोज पाटील, सुनील गायकवाड, प्रणव गायकवाड, अविनाश अडागळे, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) पक्षाचे पेण तालुका अध्यक्ष चिंतामण कांबळे, सरचिटणीस विजय अडसुले, शैलेश भोसले तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply