खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ यांची बुधवारी (दि. 10) बिनविरोध निवड करण्यात आली. अजय भारती यांनी राजीनामा दिल्यामुळे माणकीवली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते.
माणकीवली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बुधवारी दुपारी सरपंच चंदन भारती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी भाजपचे विकास रसाळ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी सदस्य अर्चना पिंगळे, दिप्ती देशमुख, निलम चोरगे, भावना देशमुख, रोशन देशमुख, वामन देशमुख, सारिका पवार, ग्रामसेवक बी. एस. चव्हाण आदी उपस्थित होते.
भाजपचे विकास रसाळ यांची निवड जाहीर होताच भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, खालापूर तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पिंगळे, विष्णू ठोंबरे, पुंडलीक रसाळ, भानुदास रसाळ, भगवान देशमुख, विशाल भोर, अंजिक्य शिंदे, जगदीश पारांगे, मनोज बोडके, कुशल रसाळ, रुषी रसाळ, गणेश रसाळ, उद्देश सिंग, कल्पेश रसाळ, संदीप पिंगळे, मच्छिंद्र रसाळ, राकेश हाडप, अरुण पारांगे, प्रमोद रसाळ, नरेश रसाळ, विजय ठोंबरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper