माणगाव ः प्रतिनिधी
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा संसर्ग माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत पाच, निजामपुरात चार आणि पानसई गावात एक अशा 10 रुग्णांचा कोरोना अहवाल मंगळवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली आहे. तालुक्यातील एकूण 141 बाधित रुग्णांपैकी 69 रुग्ण
स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बरे होऊन घरी परतले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.ही महामारी जून-जुलै महिन्यात माणगाव तालुक्यात डोके वर काढेल अशी भीती अनेकांना वाटत होती.त्याचप्रमाणे या दोन महिन्यांत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून तालुक्यात रुग्ण बरे होण्याची संख्याही चांगली आहे. तालुक्यातील मोर्बा व निजामपूर गाव लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याअखेरपर्यंत कोरोनामुक्त होते, मात्र लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात या गावांतून रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून येथील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper