176 लोकांनी घेतला लाभ
कर्जत : बातमीदार
माथेरान शहर भाजप आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रांगोली हॉटेलमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 176 लोकांनी घेतला.
माथेरानमधील रांगोली हॉटेलचे संचालक डोरीक नथवाणी यांच्या हस्ते या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपाध्यक्ष किरण चौधरी, सरचिटणीस राजेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रतिभा घावरे, प्रदीप घावरे, प्रियांका कदम, संदीप कदम, राकेश चौधरी, रुपाली आखाडे, अरविंद शेलार, संध्या शेलार, चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ सल्लागार जनार्दन पार्टे, रजनी कदम, कार्यकर्ते बाबू बर्गे, शैलेंद्र दळवी, अनिल गुप्ता, सुजय भोसले आदी उपस्थित होते.
नेत्र तपासणी शिबिराला ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. शिबिरात 176 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी मोतीबिंदूचा त्रास असलेल्या रुग्णांवर पनवेल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचार्यांनी डोळ्यांचा आजार असलेल्या रुग्णांवर या वेळी उपचार केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper