पनवेल ः अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रंगली. अंतिम फेरीचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अभिनेते प्रभाकर मोरे, भरत साळवे, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष तथा महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper