Breaking News

माहीचे भन्नाट बाइक कलेक्शन

मुंबई ः प्रतिनिधी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कार व बाइकची आवड असल्याचे अनेकांना माहीत आहे. धोनीकडे अनेक महागड्या बाइक आणि कार असल्याचे म्हटले जाते. तो बर्‍याच वेळा रांचीच्या रस्त्यांवर बाइक चालवतानाही दिसतो. धोनी सोशल मीडियावरही बाइक व कारसोबतचे फोटो शेअर करतो. नुकताच धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर माहीच्या बाइक कलेक्शनचा फोटो शेअर केला.
साक्षीने धोनीचा हा फोटो शेअर करत ‘र्एींशप इळज्ञश हर्रींश र तळशु’ असे छान कॅप्शन दिले. खरंतर धोनीच्या बाइकचा व्हिडीओ साक्षीच्या एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर तो व्हिडीओ पाहून काही वेळातच साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा फोटो शेअर केला.
माहीचे हे बाइक कलेक्शन रिंग रोड फार्म हाऊस येथील आहे. या बाइक कलेक्शनमध्ये धोनीच्या बाइक दिसत आहेत. यामध्ये अनेक महागड्या बाइकचा समावेश आहे, तसेच माही फेरारी, द जीएमसी सियरा अशा अनेक कारचा मालक आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply