लंडन ः वृत्तसंस्था
भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला आहे. ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोच एडवर्डला मागे टाकले. 38 वर्षीय मिताली राजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10337 धावा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 10273 धावा काढण्याचा विक्रम यापूर्वी एडवर्डच्या नावावर होता. या यादीत न्यूझीलंडची सुझी बेट्स 7849 धावांसह तिसर्या क्रमांकावर आहे.मिताली राजच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. मिताली जगातील सर्वाधिक वनडे सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे. 50 षटकांच्या फॉर्ममध्ये कर्णधार म्हणून तिचा हा 84वा विजय आहे. यात तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या 83 विजयांच्या विक्रमाला मागे टाकले.
RamPrahar – The Panvel Daily Paper